-->
महिलाविषयकराज्यसामाजिक

विविध उपक्रम राबवून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा

 

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील



काँग्रेस (आय) च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शिरूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याचे शिरूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रियंका बंडगर यांनी सांगितले.

 

समाजात काम करणाऱ्या गरजू महिलांना साडी वाटप, वृक्षारोपण तसेच सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिरूर शहराध्यक्षा संगीता मल्लाव, ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास थोरात, युवती अध्यक्षा शितल आनंदे, किसान काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आशाबाई जोजाळ, अपंग सेलचे अध्यक्ष त्रिंबक पवार, फक्कड थोरात, काविरा बोरगे तसेच अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होते.

 

आज समाजात अनेक महिला या काम करत असताना फक्त आर्थिक परिस्थिती बेताची नसल्याने त्यांना प्राथमिक गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत. वृक्षारोपण ही काळाची गरज असून फक्त वृक्षारोपण न करता लावलेले वृक्ष जगवणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत यावेळी काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा प्रियांका बंडगर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close