-->
करमाळाविशेष

कौतुकास्पद- मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील सातोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश कोडलिंगे यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

आजकाल आपण पाहत आहोत वाढदिवसावर किती वायफळ खर्च केला जातो. यामध्ये पार्टी जाहिरातबाजी, प्रसिध्दी, केक कापने, फटाके फोडणे अशा सर्व खर्चाला फाटा देऊन जि.प. सातोली शाळेचे मुख्याध्यापक रमेश कोडलिंगे यांनी त्यांचा ५३ वा वाढदिवस आगळया वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी केक न कापता गरजू विद्यार्थ्यांना ५० वहया व ५० पेन वाटून शाळेमध्येच वाढदिवस साजरा केला.

 

 

यावेळी उपशिक्षक दिलीप माने, सौ. साळुंखे मॅडम, व विद्यार्थी उपस्थित होते. असा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी फरतडे, पुनर्वसन शाळा कंदरचे मुख्याध्यापक भास्कर खुपसे व कंदर केंद्र प्रमुख साईनाथ देवकर यांनी कौतुक केले. खर तर आज सर्वांनीच कोडलिंगे गुरूजी यांचा आदर्श घेणे सारखा आहे. असे यावेळी साईनाथ देवकर यांनी सांगितले. केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे यानी सुध्दा त्यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सातोली परिसरातून या शिक्षकाचे कौतुक केले जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close