
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे पांगरे येथील प्रतिष्ठित नागरिक व श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी पांगरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून व शाळेमध्ये शुशोभिकरण करण्यासाठी झाडे भेट देऊन आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
ॲड. सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या उपक्रमामुळे लोकांना आपले वाढदिवसा सारखे कार्यक्रम साजरे करत असताना समाजसाठी गरजेच्या गोष्टींची जाणीव होईल. असे सामाजिक नवीन पिढीसाठी काहीतरी उपयोगी ठरतील. अशा समाजपयोगी कार्यक्रमामुळे इतरांना ही आपले वाढदिवसा सारखे कार्यक्रम साजरे करण्याची प्रेरणा मिळेल. ॲड. सोनवणे यांनी शाळेमध्ये जाऊन मुलांमध्ये मिसळून लहान मुलांना प्रेरणादायी अशा काही गोष्टी सांगून आपला वाढदिवस मुलांबरोबर साजरा केला.
याप्रसंगी पांगरे गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये उपसरपंच श्री. गणेश वडणे, माजी उपसरपंच श्री. सचिन पिसाळ, श्रीराम बचत गटाचे अध्यक्ष श्री. जोतीराम गाडे पाटील, आण्णा गुंजाळ, तुकाराम पिसाळ, नागेश वडणे, शिवराज मणेरी, तुषार दोंड, दादा गुटाळ, कैलासगुटाळ, सुधिर दोंड, सतिश भगत, विष्णु जाधव असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त साध्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.




