हवेली/प्रविण शेंडगे


धर्मेंद्र सातव यांचा एका सर्वसामान्य कुटुंबांमध्ये जन्म झाला. दोन भाऊ, दोन बहिणी, आई, वडील अशा परिवारामध्ये ते वाढले. आपले बहिण, भाऊ व समाजातील इतर मुलांपेक्षा आपले अस्तित्व वेगळे आहे. आपण इतरांप्रमाणे सरळ चालू शकत नाही, पळू शकत नाही. परमेश्वराने आपली चूक नसतानाही आपल्याला अपंगत्व जन्माला का घातले? या विचाराने त्यांना खूपच निराशत्व आले होते.
स्वभाव चिडचिडा झालेला होता, सतत इतरांशी भांडत असल्यामुळे ते वादग्रस्त झाले होते. वडिलांनी एकदा जवळ घेऊन त्यांना मोलाचा संदेश दिला. “तू अपंगत्वामुळे स्वतःला कमजोर समजू नकोस, निराश होऊ नकोस, जगामध्ये मनुष्य शरीराने नाहीतर कर्तुत्वाने श्रेष्ठ मानला जातो. तू तुझ्या आक्रमक स्वभावाचा वापर स्वतःच्या व समाजातील दिव्यांगांच्या कल्याणाकरिता कर.” वडिलांनी दिलेल्या या मोलाच्या सल्ल्यानंतर सातव यांनी आपल्या मनातील अपंगत्वाचा न्यूनगंड बाजूला काढून सामाजिक कार्याला सुरुवात केली.
आपल्या घरासमोरील सरकारी गावठाण जागेत सुरू असलेले गावठी दारूचे दुकान संघर्ष करून बंद केले. या जागेवर भक्तिमय वातावरण राहावे याकरिता मित्रांच्या सहकार्याने तुळजाभवानी माता मंदिर बांधले. वाघोली गावांमध्ये आपल्या पेक्षाही दिव्यांग बांधवांची अवस्था खूपच वाईट आहे. हे लक्षात आल्यानंतर वाघोली गावातील दहा दिव्यांगांना एकत्र करून सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनापुढे दोन वर्ष संघर्ष करून चार गुंठे सरकारी जागा सरकारी बाजार भावाने विकत घेतली. त्या जागेत ११ दिव्यांग यांनी स्वखर्चाने महाराष्ट्रातील पहिले व्यापारी संकुल बांधून स्वतः सह ११ दिव्यांगाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडून पुनर्वसन केले. दिव्यांग व्यापारी संकुलानासाठी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली ११ दिव्यांगानी केलेल्या यशस्वी संघर्षावर दिग्दर्शक शाकीर शेख, महेश कुडाळे यांनी चार वर्षांपूर्वी ‘मॅरेथॉन जिंदगी’ हा मराठी चित्रपट काढून महाराष्ट्रात प्रदर्शित केला. व्यापारी संकुलं निर्मिती वरच न थांबता सातव यांनी तालुका, जिल्हा, महाराष्ट्रातील, दिव्यांगांना एकत्र करून दिव्यांगांच्या मूलभूत सोयीसुविधा व अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू केला. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत. आंदोलनात पुढाकार घेऊन दिव्यांगांना सरकारी योजना मिळून दिल्या.
रक्तदान चळवळ समाजात वाढावी. तिचा प्रसार व्हावा याकरिता वर्षातून चार वेळा (एकूण ३५ वेळा) स्वतः रक्तदान करतात. तसेच वर्षातून दोनदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत असतात. जमा झालेले रक्त बॉटल सरकारी दवाखान्यात दिले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा रुग्णालय ससून यांनी ससूनचे अधिष्ठाता (डिन) माननीय श्री. अजय चंदनवाले यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.
खाजगी कंपनी कारखाने उद्योगधंदे यांनी दिव्यांगांचे शारीरिक व्यंग पाहता कौशल्य पाहून रोजगार द्यावा. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना घेऊन पुरंदर, शिवनेरी, लोहगड, कळसुबाई शिखर या ऐतिहासिक ठिकाणी दिव्यांगात्वर मात करीत वर वर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. दिव्यांगांना रोजगार मिळावा. या करिता रोजगार मेळावे आयोजित करून ३०० च्या वर दिव्यांगांना रोजगार मिळवून दिला.
केंद्र सरकार व राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना व दिव्यांग हक्क कायदा याची दिव्यांगामध्ये जनजागृती व्हावी. याकरीता दिव्यांग मेळावे, दिव्यांग जनजागृती रॅली, दिव्यांग कार्यशाळा, दिव्यांग हक्क परिषद, दिव्यांगांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना व दिव्यांग हक्क कायदा याची दिव्यामध्ये जनजागृती व्हावी याकरीता दिव्यांग मेळावे दिव्यांग जनजागृती रॅली दिव्यांग कार्यशाळा दिव्यांग हक्क परिषद यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.
नैसर्गिक आपत्कालीन संकटात शेतकरी बांधव यांच्याकरिता तसेच आत्ता कोरोना महामारी मध्ये तहसीलदार हवेली यांना घरी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीस पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातशे दिव्यांग कुटुंबांना अन्नधान्याचे कीट व कपडे वाटप केले. संविधानाने दिलेले अधिकार व हक्क याची माहिती दिव्यांगांना व्हावी. याकरिता संविधानाच्या प्रतिचे दिव्यांगांना मोफत वाटप केले. समाजामध्ये एचआयव्ही बाधित व कुष्ठरोगी रुग्ण त्यांच्याबाबत असलेले गैरसमज व त्यामुळे करीत असलेले भेदभाव दूर करावे याकरिता एचआयव्ही बाधित कुष्ठरोगी रुग्णांसोबत कार्यक्रमाचे आयोजन केले.
समाजामध्ये देशप्रेम वाढावे याकरिता २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली काढून जसे साजरी करता तसेच ०३ डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात यावा.
धर्मेंद्र सातव-




