अंगणवाडी सेविका आशा पातोंड यांना “राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन अवॉर्ड” प्रदान
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


वढू खुर्द, तालुका हवेली येथील अंगणवाडी सेविका आशा पातोंड यांना नुकताच राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते “राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन अवॉर्ड २०२१” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये पार पडलेल्या नॅशनल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स २०२१ मध्ये सर फाउंडेशन च्या वतीने सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कॉन्फरन्स मध्ये भारतातील विविध विद्यालयातील शिक्षक यावेळी उपस्थित होते. यामध्ये आशा पातोंड यांच्या परसबाग या उपक्रमाची निवड करण्यात आली.
सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम मासाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे व सर्व टीम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘नॅशनल टीचर्स इनोव्हेशन अवार्ड २०२१’ पुरस्कार वितरित करण्यात आले. या उपक्रमासाठी वढू खुर्द येथील अंगणवाडीच्या मदतनीस नंदिनी निळेकर, सरपंच मोहिनी भोंडवे, उपसरपंच सीमा भंडलकर, ग्रामपंचायत सदस्या रसिका चोंधे, वंदना दरेकर, रामदास भंडलकर, नवनाथ पवळे, महेंद्र खांदवे, कोमल धुळे, शंकर काकडे, पोलीस पाटील मच्छिंद्र भोंडवे आदींचे सहकार्य लाभले.




