कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


शिरूर तालुका बार असोसिएशन व विधी सेवा समिती, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “आजादी का अमृत महोत्सव” या अभियानांतर्गत शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित आयोजित करण्यात आले.
या शिबिरात शिरूर तालुका बार असोसिएशनचे सदस्य अँड. दत्तात्रय गव्हाणे पाटील, अँड. व नोटरी विकास फडतरे, भाजपा वकिल आघाडीचे अँड. सचिन गव्हाणे पाटील, अँड. अमित दोरगे, अँड. विरभद्र मलभागे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना पी. एम. आर. डी. ए. या कायद्याबाबत प्रस्तावित आरक्षण, कायदा व त्यातील धोके तसेच इतर कायदेविषयक महत्वाचे सविस्तर मार्गदर्शन केले.
सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, मनिषा गव्हाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बबुशा ढेरंगे यांनी मार्गदर्शन करणाऱ्या वकिलांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्माम केला.
या प्रसंगी माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, प्रकाश ढेरंगे, शिरूर तालुका भा.ज.पा. चे चिटणीस संपत गव्हाणे पा., सुनिल ढेरंगे, निखील ढेरंगे, कृष्णाबाई गव्हाणे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन ॲड. दत्तात्रय गव्हाणे पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार मधुकर कंद यांनी केले.



