हवेली प्रतिनिधी/कालिदास गावडे


थेऊर येथील केजी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. खंडू गावडे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मंगलताई खंडू गावडे यांच्याकडून गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी. म्हणून गेल्या तीन वर्षांपासून दिवाळी साहित्य आणि फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ही वर्षी शिरूर- हवेलीचे कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार अँड. अशोक (बापू ) पवार यांच्या यांच्या शुभहस्ते महिलांना दिवाळीचे साहित्य आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम खंडूशेठ गावडे जनसंपर्क कार्यालय येथे दिपावली च्या पूर्वसंध्येला पार पडला.

यावेळी केजी युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी सौ. मंगलताई गावडे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या कुमारी गौतमी मारुती कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे हे उपस्थित होते. या वेळी केजी फाऊंडेशनच्या कामाचे स्वरूप आणि फाउंडेशनच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या सुविधा जनसामान्यांपर्यंत पोचविण्यात येतील याची माहिती मारुती कांबळे यांनी दिली. या प्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष खंडुशेठ गावडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी रोजगार व व्यवसायासाठी फाऊंडेशनच्या वतीने पुर्ण सहकार्य केले जाईल. बचत गटांना प्रोत्साहन देऊन उद्योग उभारण्यास मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना शिरूर- हवेलीचे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार यांनी केजी युथ फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले. पुढील काळात फाउंडेशनला कुठल्याही मदतीची गरज भासल्यास सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली. पुढे बोलताना त्यांनी महिला वर्गाला शासकिय योजनांविषयी माहिती दिली. कोणाला काही योजनांविषयी अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती शिरूर- हवेली चे लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशेल चिवडशेट्टी, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय फराटे, शशिकला ताई वाघमारे, हवेली पंचायत समिती सभापती संजीवनीताई कापरे, जीवन ज्योती गौरव समिती आदर्श पुरस्कृत हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस लक्ष्मण चव्हाण, नगरसेवक पुणे मनपा योगेश (बापू) ससाने, स्वीकृत नगरसेवक पुणे मनपा अविनाश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव पवन काळे, प्रभाग २३ अध्यक्ष हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस गणेश बोराटे, शिवराज्य संघटना अध्यक्ष आयुब पठाण, सामाजिक कार्यकर्ते मोहन थोपटे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा पडळकर, कैलास खोमणे, काळूराम चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्षा भोरडे ताई, शोभा हरगुडे, सिताताई जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे, संगिता सावंत, अपर्णा गजरे, मनिषा आखाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायकवाड, देवा गावडे, योगेश गावडे, सचिन राऊत, दादा गुरव, रोहीदास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.



