महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


केसनंद, ता. हवेली येथील शोभा हरगुडे यांची नुकतीच महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महिला पुणे जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस व पुणे जिल्हास्तरीय शासकीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समितीचे सदस्य प्रदीप वसंत कंद, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, निरीक्षक कविता आल्हाट, उपाध्यक्ष मंगेश सातव, चंद्रकांत जाधव, डी. एल. हरगुडे, कानिफनाथ सावंत, मंगेश हरगुडे, पांडुरंग हरगुडे, भरत चव्हाण, विपुल गायकवाड, श्रीकांत पाटोळे, सुरेखा भोरडे, हसन शेख, लिलाबाई हरगुडे, सीता जाधव, मंगल ठाकूर आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष जी जबाबदारी देईल त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस चे जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा शोभा हरगुडे यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक गावात – वाड्यावस्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावे सत्काराला उत्तर देताना हरगुडे यांनी सांगितले. शोभा हरगुडे यांच्या नियुक्ती मुळे जिल्ह्याच्या बरोबरच पूर्व हवेली भागात पक्षाची ताकत वाढण्यास मोठी मदत होणार आहे.



