प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


मौजे निमगाव(ह.) तालुका करमाळा येथे ग्रामपंचायत निमगाव (ह.) व पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न झाले सदर शिबिराचे उद्घाटन निमगाव येथील ज्येष्ठ नागरिक पोपट कृष्णा भोसले, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री कैलास गाडे यांचे हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नानासाहेब निळ सर यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे तसेच निमगाव विकास सेवा सोसायटीचे संचालक श्री सिद्धेश्वर जगदाळे, श्री संजय कुंभार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल भोसले, हे उपस्थित होते.
शिबिरात निमगाव(ह.) व पंचक्रोशीतील एकुण ४७ आबालवृद्ध व महिला यांची तपासनी करण्यात आली. उपस्थित लोकांची तपासणी बुधरानी हॉस्पिटल च्या नेत्रचिकित्सक डॉक्टर माया हजारे तसेच सहाय्यक दिनेश जैन यांनी केली.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच श्रीकांत निळ, सरपंच प्रतिनीधी नितीन जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा नीळ, ऋषिकेश चव्हाण, हनुमंत नीळ, संभाजी भोसले, विक्रम कुंभार, वेताळ नीळ, राजेंद्र शिंगन, राजेंद्र गोसावी, चंद्रकांत साळुंके, शंकर गोसावी, दादासाहेब भोसले, श्रीराम नीळ हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक मनोज लटके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत जगदाळे, बाबासाहेब जगताप इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले.



