हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


पत्रकारितेत व संघटनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संपूर्ण भारत भर पत्रकार हितासाठी काम करणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन भारत सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेचा मानाचा असलेला “पत्रकार रत्नम” हा पुरस्कार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांना मिळाला असून पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.
आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेला २० वर्ष पूर्ण होऊन २१ व्या वर्षात पदार्पण केल्याने त्यानिमित्त पुणे कात्रज नऱ्हेगाव वृंदावन हॉल येथे राष्ट्रीय बैठकीचे आयोजन दि. ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
यावेळी हा पुरस्कार पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती, भारत संयुक्त प्रभारी अजयकुमार मिश्र, प्रदेश अध्यक्ष सचिन शिंदे, हवेली तालुका अध्यक्ष प्रविण शेंडगे, सूर्यकांतजी कदम, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शिवाजीराव कांबळे, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, दिल्ली सचिव राजेश जैन, डॉ. ब्रजेश यदुवंशी, राष्ट्रीय संघटन मंत्री भुपेंद्र अग्रहरी, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, दौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी सल्लागार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे, चित्रपट, कला व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबराव उर्फ यश काळे, नऱ्हे गावचे सरपंच सागर भूमकर, मुंबई सचिव अनिल गुप्ता, पूर्वांचाल प्रभारी मकसूद अहमद आजमी, दिल्ली सचिव राजेंद्र जैन, पूर्वांचाल प्रवक्ता राजेंद्र प्रसाद रॉय, अनिल सिंग आजमगड, मानिकचंद गुप्ता आजमगड, विवेकानंद पांडे पूर्वांचाल प्रभारी, राहुल पांडे आजमगड यांच्या सह, परमेश्वर सिंग अध्यक्ष नवी मुंबई, संजय चतुर्वेदी कोषाध्यक्ष महाराष्ट्र, शिक्षण सम्राट चिंतामणी पांडे (जोगेश्वरी), आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




