-->
करमाळासामाजिक

ज्येष्ठ पत्रकार के.डी. गव्हाणे यांना ‘या’ संस्थेकडून “पुणे गौरव पत्रकारिता पुरस्कार” प्रदान

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष, सुयश दिनदर्शिका संपादक के. डी. (भाऊ) गव्हाणे पाटील यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात पुणे सोशल फाउंडेशन व जिद्द फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्ताने दिला जाणारा सन २०२१ चा “पुणे गौरव पत्रकारिता पुरस्कार” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

के. डी. गव्हाणे यांनी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल सदर पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडावीत असताना सुयश दिनदर्शिके च्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला विविध मान्यवरांचे मनोगते प्रत्येक वर्षी कॅलेंडर च्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतात. आता पर्यंत तब्बल १३७ विविध प्रकारचे जिल्हा व राज्य स्तरीय पुरस्कार के. डी. गव्हाणे यांना मिळाले आहेत. पुणे गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सन्मान करत शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सदर पुणे गौरव पुरस्कार हा सुर्यदत्ता इंस्टीट्युटचे चेअरमन डाॕ. संजय चोरडीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माईड पाॕवर ट्रेनर डाॕ. दत्ता कोहिनकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॕड. गणेश सातपुते व अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close