जवाहर नवोदय विद्यालयात कोरेगाव भीमा जि.प. केंद्र शाळेतील सात विद्यार्थ्यांना प्रवेश
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाच्या जिल्हा परिषद केंद्रशाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांची पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट, ऑनलाइन अभ्यासक्रम यामधून देखील कसरत करत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असुन याबद्दल त्यांचा विद्यालय व ग्रामस्थांचे वतीने सन्मान करण्यात आला. जवाहर नवोदिय विद्यालयात प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा प्रताप मुसमाडे, संघराज संतोष शिंदे, ऋतुराज कचरू बवले, हिमांशू तेजराव किनकर, बालाजी संदीप भोकरे, सिद्धी चंद्रकांत अभंग, प्राणिता संतोष वाघमारे यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शीतल सुभाष डिके, रुपाली रवींद्र बावकर या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, पंचायत समितीचे श्री. कळमकर, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत उपाध्यक्षा संध्या शिंदे, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, केंद्रातील मुख्याध्यापक काळूराम भिलार (आपटी), सुखदेव नरके (दरेकरवाडी), दत्तात्रय वाजे (ढेरंगे वस्ती), मंगेश काळे (डिंग्रजवाडी), शुभांगी पवार (नरेश्वर वस्ती), सुनील मिडगुले (वाडा पुनर्वसन), बन्सीलाल ढगे (फडतरे वस्ती) यांच्या सोबत कोरेगाव भीमा केंद्रशाळेतील सहकारी शिक्षक जयमाला मिडगुले, सुरेश सातपुते, तुकाराम सातकर, गणेश दाते, चंद्रकला कुसाळे, इंदुमती शेळके, वनिता कालक, शैलजा टाकळकर, सरोज सातकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.




