स्त्रीत्वाचा अभिमान बाळगूया, आई-वडिलांचा मान राखूया; डॉ. पद्मजा खरड यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


दत्तकला शिक्षण संस्था संचलित भिगवण येथिल दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल मध्ये आज गुरुवार दि. १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी डॉ. पद्मजा खरड यांनी जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधून विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. मुलींचे वय वाढत असताना शरीरात होणारे बदल याबद्दलही त्यांनी माहिती दिली. कोणत्या वयात कोणता उत्तम आहार घेतला पाहिजे. तसेच शरीरासाठी व्यायामाची गरज किती महत्त्वाची आहे. याबाबत मार्गदर्शन करत असताना मुलींना दररोज सूर्यनमस्कार करण्यास सांगितले.
समाजात वावरत असताना Good touch Bad touch ओळखता आला पाहिजे. तो कसा ओळखावा हेही त्यांनी मुलींना सांगितले. प्रथम तुम्ही तुमचा आदर्श कोण आहे तो ठरवा. तुमच्या वागण्यात संयम ठेवा. आपल्या कोणत्याही कृतीने आई-बाबांची मान खाली जाणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी मुलींची आहे याचे मुलींनी भान ठेवावे असे त्यांनी ठणकावून सांगितले. शिका मोठे व्हा विद्वान बना. तुमचे अनुभवी शिक्षक तुमचे आई-बाबा यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐका आणि मोबाईल थोडा बाजूला ठेवून वाचन करण्याकडे लक्ष द्या. कारण मोबाईल पेक्षा स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. त्याकडे लक्ष द्या हेही त्यांनी सांगितले. स्त्री ही नवनिर्मिती करणारी समाजातली एक महान शक्ती आहे ती शक्ती तुम्ही ओळखून एवढं सुंदर कर्तुत्व निर्माण करा की, समाजाला तुमचा अभिमान वाटेल. असे सांगत पद्मजा मॅडम यांनी मुलींना वेळात वेळ देऊन अनमोल मार्गदर्शन केले.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, संस्थेच्या सचिवा सौ. माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी सन्माननीय डॉ. विशाल बाबर सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ. नंदा ताटे मॅडम, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. यादव मॅडम, इन्चार्ज खाडे मॅडम, धेंडे सर, मनी मॅडम, रघुनाथ सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी झोरे मॅडम यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.




