-->
करमाळामहिलाविषयक

शिवकन्या अकॅडमीच्या वर्धापनदिनानिमित्त करमाळ्यात आरोग्य गुढी व स्नेहमेळावा उत्साहात

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

गेल्या दहा वर्षांपासून महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या शिवकन्या अकॅडमीच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळ्यात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

कार्यक्रमाची सुरुवात शिवकन्या अकॅडमीच्या नवीन फलकाच्या अनावरणाने झाली. हे अनावरण करमाळ्याच्या नगराध्यक्षा मा. मोहिनी संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका चैताली सावंत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अपर्णा भोसले आणि श्रद्धा तपसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारतीय संस्कृती आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी अकॅडमीच्या सदस्य महिलांनी ‘आरोग्याची गुढी’ उभारून वेगळा उपक्रम साकारला. यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.

 

या वेळी महिलांनी सादर केलेली नाटिका उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतली. मुलीच्या जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत च्या तिच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेमुळे अनेकांच्या भावना दाटून आल्या. अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गायकवाड यांनी ‘माईंड ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शारीरिक आरोग्यासोबत मानसिक खंबीरपणाही तितकाच आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा जुन्या मैत्रीला उजाळा देत महिलांना एकत्र आणण्याचे काम या कार्यक्रमातून झाले. घरातून सुरू झालेली ही अकॅडमी आज शेकडो महिलांचा आधार बनली असून, महिलांच्या संघटनशक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close