करमाळा
आदिनाथनगर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चिंचकर तर उपाध्यक्षपदी धेंडे यांची निवड

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


आदिनाथ सह. साखर कारखाना, आदिनाथनगर (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नाथा रामचंद्र चिंचकर यांची तर उपाध्यक्षपदी अरविंद धेंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड फ्रेंड्स बीजेपी चे करमाळा तालुकाध्यक्ष रविकिरण माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
या प्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष नाथा चिंचकर म्हणाले की, शाळेसाठी सर्व प्रकारे मदत करू तसेच पुढील काळात शाळेमध्ये विविध शालेय उपक्रम व विद्यार्थी हिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करणार आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिक गोळे मॅडम, पवार मॅडम, सदस्य दीपक वाघे, पै. आप्पा भोसले, भालेराव, काटे, सय्यद, शिंदे, बातखबर, धडस तसेच परिसरातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.



