-->
करमाळाराजकिय

करमाळ्यात ‘जोडे मारो’ला ‘दुग्धाभिषेक’ने उत्तर; संजय राऊतांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

भाजपच्या आंदोलनानंतर ठाकरे गटाचा पलटवार; सुभाष चौकात घोषणांनी परिसर दणाणला

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

सध्या महाराष्ट्रात खासदार संजय राऊत आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील सुरु असलेल्या राजकीय वादाचे पडसाद आता करमाळ्यातही तीव्रपणे उमटू लागले आहेत. काल भाजपाने करमाळ्यात संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. त्याला आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक आंदोलन करून प्रतिउत्तर देण्यात आले.

 

करमाळा शहरातील सुभाष चौक येथे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रिमझिम पावसात खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यावेळी “आवाज कुणाचा… शिवसेनेचा”, “उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “आदित्यसाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “संजय राऊत तुम आगे बढो”, “संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

यावेळी बोलताना शंभूराजे फरतडे यांनी, संजय राऊत हे दबावाला न झुकता सत्यासाठी लढणारे नेते आहेत. त्यांच्या या लढ्याला बळ मिळावे, या हेतूने दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले, असे सांगितले. तसेच शहरप्रमुख प्रविण कटारिया यांनी, भाजपाने आंदोलनाची पातळी सोडली, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

 

या आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवासेना शहरप्रमुख समिर हालवाई, संतोष भालेराव, पंकज परदेशी, अजय साखरे, प्रसाद निंबाळकर, कल्पेश राक्षे, लिंगेश्वर गोमे, विनोद पाटील, बालाजी वाडेकर, आकाश सरडे, बाळराजे फरतडे, शिवाजी नाईकनवरे, ज्ञानदेव लोंढे, बाबुराव सरकाळे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिपक लावंड, दादासाहेब डौले, दत्ता कांबळे, राजेंद्र पवार यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वादाची ठिणगी, आंदोलनांची मालिका

         खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. काल भाजपाने राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला, तर आज ठाकरे गटाने त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून समर्थन व्यक्त केले. सलग दोन दिवस झालेल्या आंदोलनांमुळे करमाळ्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close