माय मराठी न्युज नेटवर्क


राजस्थान पोलीसांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी एक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बेवार येथील निलंबित डीएसपी हिरालाल सैनीला एसओजी टीमने गुरुवारी उदयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिला कॉन्स्टेबल सोबत हिरालाल सैनीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतरच या डीएसपी च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसपी हिरालाल सैनी उदयपूरमध्ये असल्याची माहिती मिळताच चाइल्ड पोर्नोग्राफी प्रतिबंधक (एसओजी) टीमने त्याला उदयपूरच्या अनंता रिसॉर्टमधून अटक केली आहे.
डीएसपी हिरालाल सैनीला अटक केल्यानंतर प्रथम उदयपूरच्या अंबामाता पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीसाठी आणण्यात आले होते. मात्र, येथील कागदोपत्री कारवाई केल्यानंतर एसओजीची टीम आरोपी डीएसपी सह जयपूरला पोहोचली. नवीन व्हायरल व्हिडीओ मध्ये सहा वर्षांचे एक मूल देखील दिसत होते. या संपूर्ण प्रकरणाची एसओजीच्या (चाईल्ड पोर्नोग्राफी) टीमकडून चौकशी केली जात असून डीएसपी ला ही त्याच टीमने अटक केल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही डीएसपी हिरालाल सैनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबल सोबत नाचताना दिसत आहे.
ज्या व्हिडीओ मुळे ही घटना उघडकीस आली आहे तो व्हिडीओ उदयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये शूट केला गेल्याचे आता उघड झाले आहे. या व्हिडीओ मध्ये डीएसपी हिरालाल सैनी आणि एक महिला कॉन्स्टेबल एकत्र अंघोळ करत अश्लील चाळे करतांना दिसत आहेत. त्याच व्हिडीओ मध्ये एक सहा वर्षाचा मुलगाही दिसत आहे. जो त्यांच्याच बाजूला एका फुग्यासोबत खेळत आहे. डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल फक्त स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असते तर कदाचित कुणी आक्षेपही घेतला नसता. पण, त्या सहा वर्षाच्या लहान मुलासमोर हे दोघेही नग्न अवस्थेत अश्लिल चाळे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच या अश्लिल व्हिडीओ वर राज्य बाल संरक्षण आयोगाने आक्षेप घेत कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन दिवसा मध्ये पोलीस अधिक्षकांना सदर घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यास सांगितला आहे.




