केतकी माटेगावकरचं नवीन हिंदी गीत लवकरच रसिकांच्या भेटीला
'पुणे टू गोवा' या हिंदी चित्रपटासाठी केले आहे पार्श्वगायन
माय मराठी न्युज नेटवर्क


प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटासाठी नुकतेच पार्श्वगायन केले असून
” सारी कसर दिल की तुझंपे निकाल दु ! मे रात भर तुझे प्यार दू “
असे या गीताचे बोल आहेत. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले आहे. या गीताला सन्मित वाघमारे यांनी संगीतबद्ध केले असून संगीत संयोजन अमोघ इनामदार यांनी केले आहे. तर गीताचे बोल गीतकार रॅपर ब्रोज यांचे आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत हे आहेत.
अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने विविध भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना गीताचे बोल व संगीत भाराहून टाकणारे आहे. या गीताचे बोल लयबद्ध असल्याने गीत गाताना खूप छान वाटले असे केतकीने यावेळी सांगितले. तर या गीताला केतकी माटेगावकर व हिंदीतील प्रसिद्ध गायक शाहिद मल्या यांचा आवाज लाभलेला आहे.
‘पुणे टू गोवा’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येईल अशी माहिती चित्रपटाचे निर्माते आदित्यराजे मराठे, प्रल्हाद तावरे, किशोर खरात यांनी दिली. यावेळी दिग्दर्शक अमोल भगत म्हणाले की, हिंदीतील मल्टिस्टार कास्ट या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.



