-->
क्राईमदेशराजकिय

‘या’ भाजप नेत्याची गळा दाबून हत्या..? राहत्या घरात सापडला मृत्यदेह.!

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. आत्माराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या घरात एकटेच राहत होते. डॉ. आत्माराम तोमर यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

बडौतच्या बिजरौल रोड या ठिकाणी आत्माराम तोमर यांचे निवासस्थान आहे. टॉवेलच्या साहाय्याने आत्माराम तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांची कार देखील गायब झाली आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर तोमर यांचा मृतदेह बेडवर होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. यानंतर ड्रायव्हरने तात्काळ पोलिसांना पाचारण केले आहे.

 

या घटनेने परिसरात व पोलीस प्रशासनामध्येही एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा एसपी, एएसपी, सीओ यांनीही घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. यानंतर श्वान पथक घटनास्थळी बोलावण्यात आले. जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करण्यात आली. यासोबतच जवळपास लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात आले. दुसरीकडे, मृत डॉ.आत्माराम तोमर यांचा मुलगा डॉ. प्रतापही घटनास्थळी पोहोचले. सध्या, मृत्यू किंवा हत्येचे कारण समजू शकले नाही.

 

डॉ. आत्माराम तोमर हे जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक राहिले आहेत. त्यांनी १९९३ साली छपरौली या ठिकाणी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती आणि १९९७ साली भाजपाने त्यांना मंत्रिपद देखील दिले होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close