-->
Uncategorized

MIDC मधील कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता तर अन्य सहा कामगार गंभीर जखमी

माय मराठी न्युज नेटवर्क

 

बोईसर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट जे-१ मध्ये कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य सहा कामगार जखमी झाले आहेत तर एक कामगार बेपत्ता आहे.

बोईसर औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीत स्फोट होऊन नंतर भडकलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, सहा कामगार जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीच्या बॉयलरचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, स्फोटाचा आवाज तीन ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला. ही कपड्याची कंपनी असल्यामुळे स्फोटानंतर लगेचच मोठया प्रमाणावर आग भडकली. सदर दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात आठ कामगार काम करीत होते. स्फोटातील एका कामगारांचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर एक कामगार बेपत्ता आहे. अन्य सहा कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर बोईसरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

 

मिथिलेश राजवंशी असं मृत झालेल्या कामगाराचं नाव आहे. तर, छोटे लाल सरोज हा कामगार बेपत्ता आहे. जखमींमध्ये गणेश विजय पाटील, अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी यांचा समावेश आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close