हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, पर्यावरण संरक्षण समिती कुंजीरवाडी तसेच एव्हरेष्ट स्पन पाईपचे चेअरमन अविनाश जगताप या सर्व कोविड योद्ध्यांचा सन्मान हनुमंत आण्णा चौधरी प्रतिष्ठान, गोरखभाऊ घुले युवा प्रतिष्ठान, सागरनाना चौधरी युवा प्रतिष्ठान व पर्यावरण संरक्षण समिती यांच्या वतीने कै. बापू अमृता कुंजीर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रा. आरोग्य केंद्र याठिकाणी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गोरख घुले म्हणाले की, सर्वांच्या दृढनिश्चय आणि प्रयत्नाने आपण आज कोरोना विषाणूला आटोक्यात आणले आहे. यापुढील काळातही अशाच रितीने कार्य सुरु ठेवून कोरोनावर निश्चितच मात करण्यात यश मिळवू, असा मला विश्वास आहे. अनेक कोरोना योद्ध्यांचा सत्कार, सन्मान करण्याचे सौभाग्य लाभले याचा मला अभिमान आहे. कोरोना योद्धे म्हणजे देवदूत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह मदतीस असलेले इतर कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस प्रशासन आणि पॅरामेडीकल स्टाफ यांचेही कोरोना आटोक्यात आणण्यात मोठे योगदान आहे. यांच्याशिवाय हे कार्य अशक्यप्राय होते. त्यामुळे या सर्वांचे कार्य वंदनीय आणि पूज्यनीय आहे. सेवाभाव सर्वांनीच जोपासला पाहिजे. मानव सेवा करणे ही ईश्वरसेवा मानून पीडित आणि गरजूंना सेवा-सुविधा देण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे. हे सेवा संकल्प मिशन यापुढेही सुरु ठेवावे, अशी अपेक्षा गोरख घुले यांनी सूत्रसंचालन करताना व्यक्त केली.
यावेळी उपस्थित कुंजीरवाडी गावचे प्रथम नागरिक, सरपंच अंजु गायकवाड, उपसरपंच कैलास तुपे, मा. सरपंच बबन तुपे, अरुणआप्पा घुले, मा. उपसरपंच सुरेश कुंजीर, मा. सरपंच सोरतापवाडी आणि चेअरमन हनुमंत चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था चेरमन पूनम चौधरी, शिवसेना मा. संघटक स्वप्नील कुंजीर, कुंजीरवाडी मा. उपसरपंच संतोष कुंजीर, मा. सरपंच बायडाबाई गायकवाड, ग्रा. सदस्य सारिका भोंगळे, लता कुदळे, आशा कुंजीर, ग्रा.सदस्य चंद्रकांत मेमाणे, अजय कुंजीर, गहरेश गोठे, मा.उपसरपंच सुरेश बाप्पू कुंजीर, मा. ग्रा. सदस्य योगेश गायकवाड, मा.ग्रा.सदस्य विकास निगडे, पो पाटील मिलिंद कुंजीर, मा.तंटामुकी अध्यक्ष बापू घुले, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघाचे सचिव गोरखभाऊ घुले, राष्ट्रवादी हवेली उपाध्यक्ष बापू सावंत, मंच अध्यक्ष गणेश सावंत, सा.का. रामदास कुंजीर, सागर झेंडे, भाऊ झेंडे, गजानन जगताप, सुधीर कुंजीर, माऊली सावंत, अविनाश काशिकर, योगेश झेंडे, भा.ज.पा. हवेली अध्यक्ष आदेश जाधव, मा. पाणीपुरवठा अध्यक्ष सचिन कुंजीर, मा.सोसायटीचे काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर, अक्षय सावंत तसेच पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख घुले यांनी केले व आभार प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांनी केले.
कोरोना महामारीत मागील दोन वर्षांपासून सातत्याने समर्पित भाव ठेवत कोरोना योद्ध्यांनी यशस्वी काम केले. त्यामुळेच आज कोरोना महामारीचे संकट आटोक्यात असून रुग्ण संख्याही कमी झाली आहे. हे सर्वांच्या एकत्रितपणे काम केल्याचे फलित आहे.
गोरख घुले, सचिव, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ




