प्रतिनिधी


मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील बागायतदार श्री.संभाजी राजे बागल उर्फ बाळदादा यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत पर्यावरणपूरक अशी सुमारे शंभर झाडे मांगी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट म्हणून दिली.
नेहमीच वेगळे व समाजपयोगी कार्य करण्यात संभाजीराजे बागल हे अग्रेसर असतात. नवीन पिढीला वेगवेगळ्या कार्यातून आदर्श घालून देत असतात.

त्याप्रमाणे त्यांनी आज शनिवारी दि.२८ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समाजहिताचे कार्य जपत लोकांना एक आदर्श घालून दिला आहे.
याप्रसंगी मांगी येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री. नवनाथ बागल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नूतन केंद्रप्रमुख श्री. पोतदार गुरुजी यांनी शाळेतर्फे बाळदादा बागल यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
यावेळी मांगी प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद श्री. कौले गुरुजी, सौ. महामुनी, सौ. पवार, सौ. देमुंडे मॅडम व मांगी येथील शिक्षक श्री. देशमाने गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बाळदादांच्या कार्याचा आदर्श हा युवा पिढीने घेऊन सामाजिक बांधिलकी जपायला हवी. असे मत पार्श्र्वगायक प्रवीण अवचर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.



