-->
तंत्रज्ञानदेश

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; १०० रूपयांपेक्षा कमी खर्चात बरेच फायदे

 

माय मराठी न्युज

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे अनेक प्रीपेड प्लॅनची खुप मोठी यादी आहे. यामुळे रिलायन्स जिओचे अनेक वापरकर्ते गोंधळून जातात की त्यांनी या रिचार्ज योजनांमधील कोणती योजना खरेदी करावी. जे त्यांच्यासाठी किफायतशीर आहे आणि जास्तीत जास्त फायदे देखील देतात. म्हणून जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल ज्यांना जास्त पैसे खर्च न करता जिओच्या स्वस्त योजना कोणती आहे ते जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी ही अडचण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी असून या योजनेमध्ये इंटरनेट डेटा आणि कॉल दिले जातात. यासह, जिओकडे देखील अशा काही योजना आहेत ज्याची किंमत फक्त 100 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे आणि ते अधिक वैधता आणि काही प्रमाणात जास्त फायद्यांसह येतात. या सर्व योजनांबद्दल जाणून घेऊया.

 

रिलायन्स जिओचा 98 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन

अगोदर जिओच्या सर्वात स्वस्त 100 रुपयांच्या आत मधील जिओच्या रिचार्ज योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. या रिचार्ज योजनेची किंमत 98 रुपये असून या रिचार्ज योजनेचा कालावधी 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या योजनेमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो, यानुसार वापरकर्त्याला या योजनेमध्ये 21 जीबी डेटा मिळतो. दररोजचा मिळालेला डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जाते.

 

रिलायन्स जिओचा 129 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लान 100 रुपयांपेक्षा थोडा अधिक महाग जरी असला तरी यामध्ये मिळणारे फायदेही अधिक आहेत. जिओच्या या रिचार्ज योजनेची किंमत 129 रुपये असून याचा कालावधी 28 दिवसांचा आहे. या रिचार्ज योजनेमध्ये एकूण 2 जीबी डेटा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल व्यतिरिक्त 300 एसएमएस देखील दिले जातात. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud, JioSecurity आणि JioNews सारख्या अॅप्सची सदस्यता मोफत देण्यात आली आहे.

 

रिलायन्स जिओचा 149 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओची ही रिचार्ज योजना 150 रुपयांच्या आतील सर्वात उत्तम योजना आहे. 149 रुपयांच्या या योजनेमध्ये 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा मिळतो. या योजनेचा कालावधी 24 दिवसाचा आहे. दररोज मिळालेला डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते. या योजनेमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. जिओच्या या रिचार्ज योजनेमध्ये जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही येते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close