आपल्या दररोजच्या अहारात वापरल्या जाणाऱ्या लिंबूचे औषधी गुणधर्म आपल्याला जवळपास माहीत असतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लिंबूचा रोजच्या आहारात वापर करतात. पण, हा वापर करत असताना आपण लिंबू पिळून केवळ त्याच्या रसाचाच वापर करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का..? लिंबूच्या रसाप्रमाणे लिंबूची सालही औषधी गुणधर्माची असते


१) लिंबाची साल वाळवुन पुड करावी व त्याने केस धुवावे. केस रेशमी, काळेभोर व चमकदार होतात.
२) लिंबाची साल व चंदन पावडर याने चेहरा धुतल्यास चेहरा सतेज व सुंदर होतो.
३) लिंबाच्या सालीत विटामिन सी भरपूर असतं तेव्हा याचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करावा. दात पांढरे शुभ्र व मोत्यासारखे दिसतात.
४) लिंबाच्या सालीत कॅन्सरसारखी व्याधी दूर करण्याची क्षमता आहे. लिंबू फ्रिज मध्ये ठेऊन मग किसावे. हे तूम्ही सलाड मध्येही वापरू शकता.
५) लिंबाच्या सालीत मधुमेह दुर करण्याची क्षमता आहे. लिंबापेक्षा सालीमध्ये जास्त प्रमाणात विटामिन असते.
६) नखे सुंदर व ग्लोसी दिसावित असे वाटत असेल तर, अगोदर कोमट पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर लिंबाच्या सालीने घासावे. नखे अतिशय मजबुत व गुलाबी दिसतात.
७) लिंबाच्या सालीवर मीठ टाकून त्याने हाताची कोपरे साफ करावी. काळेपणा निघुन जातो. याच प्रकारे मानही साफ केली जाते.
८) लिंबाच्या साली ची चटणी, सॉस करून तुम्ही विटामिन सी, के व ई ची शरीरातील कमतरता पुर्ण करू शकता.
९) तारूण्यपिटिका, मुरूमे याकरता लिंबाची साल व मूलतानी माती एकत्र करून चेहर्याला लावावे, नंतर धुवावे, चेहऱ्यावर डाग देखील राहत नाहीत.
१०) लेमन टीः। महागडे बाजारातून ग्रिन टी आणण्यापेक्षा तुम्ही छान पैकी सुगंधित ताजा लेमन टी घरी करू शकता.
एक कप पाण्यात लिंबाची साल व आले टाकून उकळवा मग गाळून मध टाकून प्या.
मन प्रसन्न होते आणि पौष्टिक पेय घेतल्या जाते.
११) लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने हाडे मजबुत होतात, आँस्टियोपोरोसिस व आर्थ्राइटिस हे आजार होत नाही.
cpभारतीय आयुर्वेद व घरगुती उपचार गृप




