-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

नागरीकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य -डाॅ शिवराज घोगरे

करमाळा प्रतिनिधी

गेल्या दिड दोनवर्षापासुन आपण कोरोना विरुद्ध ची लढाई लढत आहोत मात्र विजयाच्या जवळपास गेल्यानंतर अतिआत्मविश्वास बेपर्वाई मुळे आपल्याला हार पत्करावी लागत असुन कोरोना गेला या भ्रमात राहिलो तर परिस्थिती गंभीर असेल त्यामुळे नागरींनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे तरच आपण कोरोनाले हारवु शकु असे मत प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ शिवराज घोगरे यांनी हिवरे येथे बोलताना व्यक्त केले.

युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे व हिवरे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आयोजित कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉ घोगरे बोलत होते. या वेळी अधीक बोलताना डॉ घोगरे म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय असला तरी मास्क, सॅनीटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे आपल्याला काटेकोर पणे पालन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

या वेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की नागरिकांनी लक्षणे जाणवताच स्वतःहून टेस्ट करुन घ्यावी व विलगीकरणात राहुण डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. वेळेत उपचार घेतल्यास कोणताही धोका नसुन घाबरून जाण्या पेक्षा काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगीतले.

 

डाॅ शिवराज घोगरे यांचा सत्कार करताना शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय माळी ,अमोल फरतडे, मुख्याध्यापक निळसर, हनपुडे सर आदी मान्यवर दिसत आहेत

या वेळी तलाठी सस्ते भाऊसाहेब युवा नेते अमोल फरतडे सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय माळी उपसरपंच प्रतिनिधी दिलीप फरतडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खाडे ,मुख्याध्यापक निळसर, हनपुडे सर,मच्छिंद्र लोखंडे रावसाहेब फरतडे ,सुनील माने, प्रदिप डौले हनुमंत डौले, बबलु जगताप उपस्थित होते.

हिवरे येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढली होती या अनुषंगाने तहसीलदार समीर माने,गटविकास अधिकारी राजाराम भोंग तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ सागर गायकवाड यांच्याकडे लसीकरण कॅम्प साठी मागणी केल्याने सदरचे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते या कोविड लसीकरण शिबिर दरम्यान 110 जणांची कोविड चाचणी करून सर्वांना लस देण्यात आली

सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी समुदय अधिकारी डाॅ शिंदे,डाॅ गोरे,उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ अशोक पाटील, आरोग्य सेवीका खोबरे सिस्टर, तळपाडे सिस्टर, आशा सेवीका मनिषा फरतडे,संगीता ओहोळ,मनिषा डिसले,शारदा डौले धनश्री ओहळ आदींनी परिश्रम घेतले

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close