-->
महिलाविषयकसामाजिक

आरंभ प्रतिष्ठान कडून “एक घास आपुलकीचा” अभियानांतर्गत चाफेवाडी येथे मोफत धान्य किटचे वाटप

 

मुरबाड प्रतिनिधी

आरंभ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या महिला रणरागिणी कक्षा कडून “एक घास आपुलकीचा” या अभियानांतर्गत मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी या गावामध्ये गरजु लोकांना मोफत धान्य किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्हा रणरागिणी कक्षाच्या उपाध्यक्षा सौ. निरजा आंबेरकर म्हणाल्या की, आरंभ प्रतिष्ठान हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समाजकार्य करत आहे तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवित आहे. गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या कोरोना या महामारी मुळे आणि सततच्या लॉकडाऊन मुळे सामान्य नागरिकांवर व मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांवर हातात काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आम्ही रणरागिनी कक्षाच्या “एक घास आपुलकीचा” या अभियानांतर्गत गरजू लोकांना मोफत धान्य किटचे वाटप करत आहोत. हे काम करत असताना आम्हाला फार समाधान लाभते. एक सामाजिक बांधिलकी जपत आमचे हे समाजसेवेचे कार्य असेच निरंतर चालू राहणार आहे.

यावेळी सौ. निरजा रुपेश आंबेरकर उपाध्यक्षा ठाणे जिल्हा- रणरागीनी कक्ष, आरंभ प्रतिष्ठान श्री. रोहितकुमार आर. प्रजापती सहसचिव ठाणे जिल्हा-आरंभ प्रतिष्ठान, सौ. मनिषा राजेश पोळ बदलापूर शहर अध्यक्षा – रणरागीनी कक्ष, आरंभ प्रतिष्ठान, कु. सुरेश पाटील शहर संघटक – आरंभ प्रतिष्ठान, रूपेश सतीशचंद्र आंबेरकर सदस्य-आरंभ प्रतिष्ठान, समर्थ लाड सदस्य आरंभ प्रतिष्ठान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close