-->
सामाजिक

केम येथील शिवशंभु भक्तांच्या वतीने ने ३४८ व्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊ मासाहेबांना मानवंदना

केम प्रतिनिधी/

करमाळा तालुक्यातील केम येथे शिवशंभू भक्तांच्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या ३४८ व्या पुण्यतिथीनिमित्त राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राजमाता जिजाऊ वंदना गीत गाऊन मानवंदना देण्यात आली.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या, केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच नाही तर सईबाई यांच्या अकाली निधनानंतर छत्रपती संभाजीराजांची जबाबदारीही त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळली. आदर्श माता, राज्यकर्त्या म्हणून जिजाबाईंकडे पाहिले जाते. त्यांचे गुण, धैर्य याचे वर्णन अनेक कथा, कांदबऱ्या, मालिका, सिनेमांतून करण्यात आले आहे. आज त्यांच्या ३४८ व्या पुण्यतिथी निमित्त केम येथील समस्त शिवशंभू भक्त यांच्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवप्रेमी अक्षय तळेकर यांनी गारद देऊन राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांचा जयजयकार केला. यावेळी ओंकार भैय्या जाधव, अध्यक्ष सागरराजे तळेकर, गणेश आबा तळेकर, सचिन जाधव, राकेश दोंड, दिपक भिताडे, गणेश नागणे, रूषी कुंभार, सोनू भाऊ आदी शिवभक्त उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close