केम प्रतिनिधी/


करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील बाळू कोरे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीमध्ये पाच फूट लांबीचा भला मोठा नाग निघाला होता. केम येथील सर्प मित्र अतुल ढावरे यांनी त्याला पकडून भाळवणी येथील जंगलात सोडून जीवदान दिले.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केम येथील सामजिक कार्यकर्ते राहुल आबा कोरे यांनी बाळू कोरे यांचा कडबा घेतला होता. तो कडबा आणण्यासाठी राहूल कोरे हे ट्रॅक्टर व मजुर घेऊन पाथुर्डी येथे गेले होते. मजुरांनी गंजीतून कडबा काढायला सुरूवात केली असता त़ोच एका मजुराला मोठा नाग दिसला. नागाला पाहून सर्वच मजूर घाबरले. त्याला पकडण्यास पुढे जाण्याचे धाडस कोणीही करत नव्हते.
त्यावेळी लागलीच राहुल कोरे यांनी केम येथील सर्प मित्र अतुल ढावरे यांना मोटार सायकल वर घेऊन पाथुर्डी येथे आणले. अतुल ढावरे यांनी गंजीतील नागाला काठीच्या सहाय्याने बाहेर काढून त्याला काठीवर खेळवत बरणीमध्ये सोडला. नंतर ती बरणी बंद करून भाळवणी येथील जंगलात सोडून त्या नागाला जीवदान दिले.
याबद्दल अतुल ढावरे यांचे पाथुर्डी येथील नागरिकांनी कौतुक केले. प्रथमच केम येथे अतुल ढावरे यांच्या रूपात सर्प मित्र लाभला आहे. ढावरे हे नागरिकांच्या हाकेला धावून येतात त्यामुळे केम परिसरातील नागरिकही आत्ता साप पाहिल्यावर घाबरुन न जाता सर्पमित्राच्या मदतीने त्यांना पकडुन जीवनदान देतात.




