महिलाविषयकविशेष
शेतमजुराच्या मुलीने बारावी विज्ञान शाखेतून मिळवीले ८८ टक्के गुण
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अकलूज येथे शिकणारी माढा तालुक्यातील उपळवटे येथील कु. पूजा शहाजी पाटील या शेतमजुराच्या मुलीने इयत्ता बारावी विज्ञान शाखेत ८८ टक्के गुण मिळवले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुळगाव चिंचोलीकाटी (ता. माढा) येथील असणारे शहाजी पाटील हे मजुरीसाठी उपळवाटे येथे राहत आहेत. या ठिकाणी देवडकर यांची शेती करू लागले. वडिलांना शेतीमध्ये मदत करत पूजाने आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि दहावी मध्ये ९३ टक्के गुण घेऊन ती केंद्रात प्रथम आली. यानंतर बारावी मध्ये ‘कमवा व शिका’ मध्ये काम करून शिकत तिने चांगले गुण मिळविले आहेत. तिच्या या यशाबद्दल जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी मानाचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान केला.




