सामाजिक
अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून दिला “हा” संदेश
- करमाळा प्रतिनिधी
केम गावचे भाजपा अध्यक्ष गणेश आबा तळेकर यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे कलिंगड कापून साजरा करण्यात आला.
सध्या स्थानिक शेतकऱ्यांच्या कलिंगडाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे केक ला खर्च न करता अशी फळे विकत घेऊन ती कापून वाढदिवस साजरा केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल.
वाढदिवसाला केक कापण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. केक खाण्यापेक्षा तोंडाला लावणे, क्रीम न खाणे असे करून तो केक खाण्यापेक्षा अधिक वाया जातो.
लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची शेती करण्यास सुरुवात केली त्यात कलिंगडाची लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे; पण आता कलिंगडाला दर खूपच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने केकऐवजी कलिंगड किंवा इतर कोणतीही फळे कापून आपला वाढदिवस साजरा केला तर प्रत्येक दिवशी अनेक फळे विकली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन त्याचा फायदा नवीन शेतकऱ्यांना होऊ शकतो, या उद्देशाने गणेश आबा तळेकर यांनी केम येथे कलिंगड कापून नवा पायंडा पाडून दिला आहे.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदिप तळेकर, व्यापारी संघटना उपाध्यक्ष सागरराजे तळेकर, पै.शिवाजी भैय्या पाटील, जय शंभूराजे परिवार करमाळा तालुका अध्यक्ष ओंकार भैय्या जाधव, सचिन जाधव, विजयसिंह ओहोळ,विष्णुपंत तळेकर, विजय तळेकर, उमेश पाडूळे, दिपक भिताडे, गणेश नागणे, नामदेव गाडे,ओंकार टोणपे आदी उपस्थित होते,
यावेळी बोलताना गणेश आबा तळेकर म्हणाले की अशा पद्धतीने इतर लोकांनीही वाढदिवस साजरे केले तर नवीन शेतकऱ्यांना उभारी मिळेल आणि समाजात वेगळा संदेश जाईल.






