करमाळा प्रतिनिधी


युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील ११८ गावात प्रत्येकी शंभर झाडे लावण्याचा संकल्प सोडून आज जेऊर विश्रामगृह येथे वृक्ष लागवडीचा शुभारंभ शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले, बिबीशन आवटे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, धुळा भाऊ कोकरे, देवानंद बागल, प्राध्यापक सरक सर, नारायण पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक संजय चौधरी, मार्गदर्शक सुनील तळेकर, युवा सेनेचे समन्वयक शंभूराजे फरतडे, माजी सरपंच अजित दादा तळेकर व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांना मोफत औषधे दिली जाणार आहेत. वृक्षारोपणाचे महत्त्व लक्षात घेता तालुक्यातील प्रत्येक गावात शंभर झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
ज्या गावातील शिवसैनिक लावलेली १०० झाडे वर्षभर जगतील व झाडांची वर्षभर निगा राखतील त्या शिवसेना शाखेला अकरा हजार रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.



