-->
सामाजिक

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कडून दिलेला शब्द पाळला जातो; गरजूंना मिळतेय मोफत रक्त पिशवी

उमरगा प्रतिनिधी

आज दि.१२ जून रोजी श्री. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे उमरगा संपर्कप्रमुख अमर शिरोळे यांनी मोफत रक्त पिशवीसाठी संस्थापक/अध्यक्ष भूषण सुर्वे यांना कॉल केला असता, अक्षय ब्लड बँक, सोलापूर येथून संजयकुमार शिंदे व पाटील साहेब यांना सांगून उमरग्यामधील गरीब गरजू पेशंटला २ बॅग मोफत देण्यात आल्या. त्यावेळी पेशन्टनेही ट्रस्ट व उमरगा शहर कमिटीच्या कामाचे कौतुक केले.

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन रक्तदान केल्यानंतर केली जाणारी मदत हि नुसती नावापुरती नाही तर खरी आहे.

उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे राजमुद्रा युवा प्रतिष्ठान दाळिंब व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरानंतर काल A पॉझिटिव्ह रक्ताच्या बॅगेची गरज होती. उमरगा तालुक्यातील दाळिंब येथिल लोकांनी ट्रस्ट च्या कमावरती विश्वास ठेऊन रक्तदान केले होते. ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे व शिवशंभू चरिटेबल ट्रस्ट उमरगा शहर संपर्क प्रमुख अमर शिरोळे यांनी अक्षय ब्लड स्टोरेज सेंटरला कॉल केला असता, ब्लड सेंटरचे चेअरमन संजयकुमार शिंदे यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाच्या नातेवाईकाकडे २ रक्त बॅग मोफत देण्यास सांगितले.

यावेळी ट्रस्टचे उमरगा शहर संपर्क प्रमुख अमर शिरोळे म्हणाले की, आपण श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी वरती विश्वास ठेऊन रक्तदान करत आहात याचा आम्हाला गर्वच आहे. आपणांस आम्ही जो शब्द दिला आहे तो असाच पाळू आपणही ट्रस्ट वर विश्वास ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
भविष्यातही ट्रस्टला अशीच सहकार्याची भूमिका आपण सर्वानी ठेवावी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे व आपण जर ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान केले असेल तर महाराष्ट्रामध्ये (पुणे- बारामती- करमाळा- सातारा- सोलापूर- बीड- अहमदनगर- कोल्हापूर- पंढरपूर) या सर्वच ठिकाणी आपणांस ट्रस्टच्या माध्यमातून १००% मदत होईल. रक्तदानात राजकारण करू नका. आपण लोकांचे रक्त जसे काढून घेता तसेच लोकांना मोफत द्यायला हि शिकाव आणि हे सगळे करून दाखवावे असे ट्रस्टचे तालुका अध्यक्ष योगेश भोळे यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close