-->
सामाजिक

शिव~संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने निमगाव(ह) येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.

करमाळा प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यातील शिव~संस्कार प्रतिष्ठान निमगाव (ह) च्या वतीने राज्याभिषेक सोहळ्या निमित्त छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस दुग्ध अभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.
त्याच बरोबर शिव~संस्कार प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात होते. या रक्तदान शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे मनोबल,इच्छाशक्ती व उत्साह वाढवण्यसाठी प्रत्येक ६ लि. पाण्याचा जार देउन त्यांना सन्मानित करण्यात आले.
शिव~संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक वर्षी रायगडावर जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येते,गडावर जाताना व येताना वाटेवर दिसणार् पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे कागद व इतर कचरा पिशव्यांत भरून गडाच्या खाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येते.परंतु या गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे रायगडावर न जाता निमगाव(ह) येथेच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंस्कार प्रतिष्ठान चे ऋषीकेश चव्हाण, मा. ग्रा.सदस्य अमोल भोसले ,सोमनाथ हालकरे, विक्रम कुंभार, दादासाहेब भोसले आदींनी परिश्रम घेतले .

यावेळी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे, ग्रामसेवक मनोज लटके, मच्छिंद्र लोखंडे , बालाजी इंगळे, जगदीश निळ पाटील, तुषार नीळ,नवनाथ रोकडे, मारूती हलकरे, शशिकांत चव्हाण, संतोष शिंगण, लक्ष्मण जगदाळे, श्रीराम निळ, समाधान टकले, सोपन चव्हाण, अतुल नीळ, आशुतोष जगदाळे, धनंजय जगदाळे, हनुमंत गोसावी,सौरभ नीळ, प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close