-->
राजकियविशेष

करमाळा भाजपा संपर्क कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी:- ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुका भाजपा संपर्क कार्यालयात आज दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष चिवटे म्हणाले की, मुघल पातशाहीच्या अंधारात बुडालेल्या जनतेला स्वराज्याचा उजेड दाखवणाऱ्या आणि सर्वस्वी रयतेचा विचार करणाऱ्या राजांचा आजच्याच दिवशी रायगडावरती ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला होता. त्यांचा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, संजय अाण्णा घोरपडे, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके, प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, पांडे गावचे ग्रा.स. नितीन निकम, नेचर डिलाईट चे संकलन अधिकारी प्रसाद गेंड, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज मुसळे, दीपक भोसले, गणेश साखरे, महादेव गोसावी, अक्षय शहा आदीजण उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close