-->
महिलाविषयकराज्य

राष्ट्रीय पोषण महा व आयसीडीएस वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

प्रतिनिधी/माय मराठी न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रीय पोषण महा व आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) चा वर्धापन दिन प्रकल्प सिन्नर-२ अंतर्गत येणाऱ्या वडांगळी बिटात शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या योजनेचा गेल्या पन्नास वर्षांतील महत्त्वपूर्ण विस्तार, अमलात आणलेले बदल आणि अंगणवाडी या संकल्पनेचे गावपातळीवरील स्थान या विषयांवर वडांगळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. नानासाहेब खुळे यांनी मार्गदर्शन केले.

 

राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमात “लोकल फॉर व्होकल” या उपक्रमावर विशेष भर देण्यात आला. यावेळी सहा महिन्याच्या बाळाचा अर्धवार्षिक वाढदिवस, गरोदर मातांचा सन्मान सोहळा तसेच दोन मातांना बेबी केअर किट वाटप कार्यक्रम पार पडले.

 

वडांगळी एकच्या अंगणवाडीतील लहानग्यांनी पालवी प्रकल्प अंतर्गत भूमिका नाट्य सादर करून सर्वांचे मन जिंकले. ज्येष्ठ सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रभावी नाटिका सादर केली. तर सेविका व मदतनीस यांनी ओवींच्या माध्यमातून चूल आणि मुल या विषयावरील बदलाचे सुंदर सादरीकरण केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वडांगळी ग्रामपंचायतचे सरपंच नानासाहेब खुळे, राहुल खुळे, भावसार मॅडम, मीनलताई खुळे तसेच विक्रमभाऊ खुळे व पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी योगेश चित्ते तसेच पालवीची संपूर्ण टीम नितीन सर, बिरदेव सर, भावना मॅडम, तेजल मॅडम ऋतिक सर, महेश सर तसेच आरोग्य विभागाचे उगले भाऊ, पराड सिस्टर त्याचप्रमाणे वडांगळी येथील आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम पर्यवेक्षिका सविता होलगडे व कल्पना गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन वडांगळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिका गीताताई खुळे, हिराबाई कांदळकर, रुपम भावसार, अर्चना खुळे, छाया खुळे व अंगणवाडी मदतनीस ताई मीरा खुळे, शैलजा जंगम, वैशाली वाघमारे पुनम तुपे यांनी केले. उपस्थित सर्वांनी लहानग्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक करत अंगणवाडी सेविकांना शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close