प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


अभिनव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिंबे ता. करमाळा येथे १४ एप्रिल २०२२ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रायमरी विभाग प्रमुख श्रीमती अनिता जाधव व अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री. आबासाहेब झोळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विचारांना उजाळा दिला. श्री. हारळे सरांनी डॉ. बाबासाहेबांच्या “शिका…संघटीत व्हा…संघर्ष करा..!” या संदेशाची मार्मिकता स्पष्ट करुन सांगितली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश साखरे सरांनी केले तर प्रा. दामाजी शेळके सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्री. निलेश जाधव सर, श्री. गोरख गुलमर सर, प्रा. यश पवार सर, प्रा. उमेश सांगळे सर व प्रा. पंकज शिंदे सर उपस्थित होते.




