-->
करमाळाक्रीडादेशविदेश

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत वीट चे सरपंच महेश गणगे निभावणार पंचाची भूमिका

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

इंडोनेशियातील बताम येथे दि. ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या “१६ व्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५” या जागतिक स्तरावरील शरिरसौष्ठव स्पर्धेत करमाळा तालुक्यातील वीट गावचे सरपंच महेश प्रभाकर गणगे हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

 

वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष दातूक पॉल चूव्‍आ आणि सरचिटणीस चेतन पठारे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान केले आहे. महेश गणगे यांनी यापूर्वीही वर्ल्ड, एशिया, साऊथ एशिया अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून यशस्वी भूमिका पार पाडली असून, त्यांच्या या योगदानामुळे वीट गाव तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

 

या स्पर्धेत जगभरातील १४३ देशांमधून सुमारे ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मेन्स बॉडीबिल्डिंग, वूमेन स्पोर्ट्स फिजिक्स, मेन्स फिटनेस फिजिक्स, मास्टर्स बॉडीबिल्डिंग अशा विविध १८ प्रकारांमध्ये पार पडणार आहे.

 

गतवर्षी मालदीव येथे झालेल्या १५व्या जागतिक स्पर्धेत भारताने “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” हा किताब जिंकत सर्वाधिक पदके मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले होते. यंदाही भारताचा संघ प्रमुख दावेदार मानला जात आहे.महेश गणगे यांची ही निवड भारताच्या फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील वाढत्या प्रतिष्ठेचे द्योतक ठरत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close