शंकर सह. साखर कारखाना कामगार सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी पवार तर व्हा. चेअरमनपदी शेख यांची निवड

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)


सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानेदव पवार यांची तर व्हा. चेअरमनपदी निनहाज शेख यांची तसेच सेक्रटरीपदी अभिजित माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कामगार सेवक पतसंस्थेच्या संचालकाची निवड करण्यात आली. या प्रसंगी संचालकपदी आनंदराव गायकवाड, कैलास कदम, दिलीप पाटील, राजाराम शेंडे, विजय करडे, सुषमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया श्री यादव साहेब यांनी केली.
यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख व कार्यकारी संचालक अभिजित डुबल, संचालक सुनील माने, आनंदराव देवकर आदी उपस्थित होते.



