-->
करमाळासामाजिक

राजा शिवछत्रपती मंडळाचा आदर्श उपक्रम; पुनवर- वडगाव रस्त्यावरील काढली काटेरी झुडपे 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

पुनवर (ता. करमाळा) येथील राजा शिवछत्रपती मित्र मंडळ यांच्या वतीने पुनवर ते वडगाव उत्तर या रस्त्यावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली काटेरी झुडपे जेसीबी मशिन च्या सहाय्याने काढण्यात आली आहेत.

 

पुनवर ते वडगाव उत्तर या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे होती. यामुळे वाटसरुंना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नव्हता. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घेऊन राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या सदस्यांनी शिवजयंती साजरी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या वर्गणीच्या रकमेतून जेसीबी मशिन लावून रस्त्याच्या बाजूची झाडे झुडपे काढली.

 

          नेहमीच समाजकार्यात पुढे असलेल्या राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या सदस्यांचे या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close