फुलगावच्या हरी उद्धव धोत्रे विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरी उद्धव धोत्रे विद्यालय, फुलगाव येथील माध्यमिक परीक्षेचा निकाल तब्बल 100 टक्के लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यशस्वी निकालाची परंपरा राखल्याबद्दल विद्यालयाचे ग्रामस्थ व शिक्षण मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद वाखारे यांनी दिली.
विद्यालयात प्रथम आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :- प्रथम क्रमांक : जयवर्धन राजेंद्र वाखारे (477 गुण 95.40 टक्के), द्वितीय क्रमांक : कैलास सुरेश लोहार (465 गुण, 93 टक्के), तृतीय क्रमांक : प्रज्वल कांताराम वागस्कर (457 गुण, 91.40 टक्के), चतुर्थ क्रमांक : यश कृष्णा थिटे (445 गुण, 89 टक्के), पंचम क्रमांक : सर्वज्ञ अनिल खळदकर (443 गुण, 88.60 टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय धोत्रे, उपाध्यक्ष नारायणराव खुळे व संस्थाचालक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.




