करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील भालेवाडी या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने गावामध्ये २५१ फळझाडांचे वृक्षारोपण केले आहे.

युवराज सुखदेव तरंगे, शितल शशिकांत पवार, आशालता सोनबा तरंगे या ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने फळझाडांचे वृक्षारोपण केले असून असा समाजपयोगी उपक्रम करणारे भालेवाडी येथील हे पहिलेचं सदस्य आहेत. या सदस्यांनी निवडणूकीच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण करून येणाऱ्या काळातील उमेदवारांसाठी एक आदर्शच निर्माण केला गेला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन सतिश तरंगे, आबासाहेब तरंगे, प्रदिप डोलारे, शशिकांत पवार, प्रशिक्षणार्थी समाज कार्यकर्ता नितीन तरंगे, अनिल तरंगे, युवराज तरंगे, मारुती खटके यांनी केले असून सदर कार्यक्रमासाठी भालेवाडी ग्रामस्थ, सर्व गावातील महिला व अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद दिला. तसेच वृक्षारोपण कार्यक्रम नियोजनानुसार पार पाडण्यात आला. यावेळी रस्त्याच्या कडेने फळझाडे लावण्यात आली आहेत. अजून २०१ झाडे उपलब्ध करून देणार असल्याचेही या वेळी सदस्यांनी सांगीतले. जमीनीची होणारी धूप रोखणे, पाणी पातळी वाढवणे व ऊनापासून संरक्षण मिळावे या उद्देशानेच वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे सदस्यांनी सांगितले.



