-->
करमाळा

केम केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

 

 

केम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम येथे आज वार शुक्रवार दिनांक १७/०७/२०२१ रोजी केम केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांची शिक्षण परिषद दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये ऑफलाईन पद्धतीने कोरोना चे सर्व नियम पाळून घेण्यात आली. यावेळी शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मुख्याध्यापक श्री. भाऊराव तळेकर गुरुजी, श्री. उत्तरेश्वर हायस्कूल चे पर्यवेक्षक श्री. भुजंग तळेकर सर, श्री. कोंडलकर सर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे श्री. बाळासाहेब देशमुख सर, नूतन विद्यालयाचे श्री. विष्णू काळे सर, शा.गो.पवार विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. धनंजय खंडाळे सर, छत्रपती संभाजी विद्यालयाचे श्री. लोंढे (आबा) सर, केंद्रप्रमुख श्री. महेश्वर कांबळे सर यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

 

यावेळी करमाळा पंचायत समितीचे विषय तज्ञ श्री. डी.डी.जाधव सर हे उपस्थित होते. विषयपत्रिके मधील सर्व विषयावर मार्गदर्शन व चर्चा झाली. शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक केम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेश्वर कांबळे सर यांनी केले. यामध्ये एक पद – एक झाड, शालेय पोषण आहार, स्वच्छ शाळा – सुंदर शाळा, ब्रिज कोर्स विषयी अधिक माहिती दिली. सेतू (ब्रिज) कोर्स याविषयी नूतन विद्यालयाचे श्री. विष्णू काळे सर यांनी मार्गदर्शन केले .स्वच्छ शाळा सुंदर शाळा याविषयी केंद्र शाळा केमचे श्री तुकाराम तळेकर गुरुजी यांनी माहिती सांगितली. मनेरगा योजनेतून स्वच्छ शाळा सुंदर शाळा याविषयी घेण्यात येणाऱ्या कामाविषयी फरतडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण चौगुले सर यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात येणाऱ्या बैठकांचे नियोजन व शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य, कर्तव्य याविषयी बिचीतकर वस्ती -१ शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश कळसाईत सर यांनी मार्गदर्शन केले. मलवडी शाळेचे उपशिक्षक श्री. रेवणनाथ देवकर सर यांनी ऑनलाईन, ऑफलाइन शिक्षण घेत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगितली. या शिक्षण परिषदेसाठी केम केंद्रातील केम, मलवडी, निंभोरे व पाथर्डी येथील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होतेे. मंगवडे गुरूजी यांनी आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close