-->
विशेषसामाजिक

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रमाने लस द्यावी; ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुजित बागल यांची मागणी

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रमाने कोरोना ची लस देण्यात यावी. अशी मागणी करमाळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुजित तात्या बागल यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०६/०६/२०२१ रोजी चे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे परिपत्रकानुसार शासनाचे कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळून सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालय चालू करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तरी सर्व वाचनालय कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमाचे पालन करीत वाचनालय चालू करावी. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने कळवले आहे. परंतु वाचनालयातील कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क पुस्तकांची देवान-घेवान करताना आणि वृत्तपत्र हाताळताना येत असतो. यामुळे शासनाने सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला प्राधान्यक्रमाने कोरोना ची लस लवकर देण्यात यावी. अशी मागणी ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष सुजित तात्या बागल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close