
करमाळा/प्रतिनिधी


केम (ता. करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार प्राचार्य एस. बी कदम सर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण ज्येष्ठ शिक्षक डी.एन तळेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती जी.के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता १० वी तील विद्यार्थी पृथ्वीराज तळेकर, स्वरुप रायचूरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी सुरेख भाषणे तसेच इयत्ता ५ वी ते १० तील विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी भाषणे केली. आज इयत्ता १० तील विद्यार्थीनी श्रुती तळेकर हिने मुख्याध्यापक म्हणून तर सानवी तळेकर हिने पर्यवेक्षक म्हणून कामकाज पाहिले. तसेच ईतर विद्यार्थ्यांनी शालेय अध्यापनाचे कामकाज पाहिले.
यावेळी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी कोंडलकर सर यांनी केले असून प्राचार्य एस.बी कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



