-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

सीना कोळगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

सीना कोळगाव प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळण्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थिती आज दि. ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या दालनामध्ये बैठक झाली असून या बैठकीमध्ये पर्यायी जमिनी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ (सर ) यांनी दिली आहे.

 

सिना कोळगाव प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळण्यासाठी ६५ टक्के रक्कम भरून घेण्यास परवानगी देण्यात यावी. हा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी कार्यान्वित होऊनही अद्याप पर्यंत निमगाव (ह), कोळगाव, आवाटी, मिरगव्हाण, करंजे, भालेवाडी या गावातील ७३२ शेतकऱ्यांना पर्यायी जमिनीचे वाटप केलेले नाही. तरी या शेतकऱ्यांची ६५ टक्के रक्कम तातडीने भरून घेण्याबाबत आपले स्तरावर आदेश द्यावेत व पर्यायी जमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे. अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी या बैठकीत केली आहे.

 

मुंबई येथील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आमदार संजयमामा शिंदे यांनी सीना कोळगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्याय जमिनी मिळण्यासाठी मंत्री महोदयांच्या दालनामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये पर्यायी जमिनी मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून थोड्याच दिवसामध्ये सीना कोळगावच्या शेतकर्‍यांचा पर्यायी जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे निळ सर यांनी या प्रसंगी सांगितले.

 

सिना कोळेगाव प्रकल्प ग्रस्तांचा गेल्या 25 वर्षापासून पर्यायी जमिनीचा प्रलंबित असलेल्या प्रश्न मार्गी लावणार असल्याबद्दल आमदार संजय मामा शिंदे यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त होत आहे. तसेच आम्हा सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

      चंद्रकांत साळुंखे.. शेतकरी

यावेळी चोबेपिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, माजी जि. प. सदस्य नानासाहेब नीळ (सर),अमित जागते, अतुल नीळ, विक्रम कुंभार, चंद्रकांत साळुंके, श्रीराम नीळ आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close