-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

मांगी तलावाचा कुकडीत समावेश करण्यासंदर्भात फेरजल नियोजन प्रस्ताव अंतिम टप्प्यात- गणेश चिवटे 

 

 

प्रतिनिधी/करमाळा

 

मांगी तलाव कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये वर्ग करण्यासाठी व सध्या तलावात पाणी सोडण्यासाठी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी सिंचन भवन पुणे येथे बैठक संपन्न झाली असल्याची माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा सोलापूर DPDC सदस्य गणेश चिवटे यांनी दिली.

आवर्षणाच्या स्थितीत मांगी तलावात कुकडीचे पाणी त्वरित सोडावे. अशी मागणी गणेश चिवटे यांनी कुकडीचे प्रमुख अधिकारी श्री कपोले साहेब यांच्याकडे केली आहे.

 

यावेळी दुष्काळी परिस्थिती व मांगी तलाव कुकडी मध्ये विलीन करण्यासंदर्भात महत्वपूर्ण व सकारात्मक चर्चा झाली. याविषयी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की, करमाळा तालुका हा कुकडी प्रकल्पाच्या टेल भागामध्ये असल्यामुळे करमाळा तालुक्याला पूर्ण क्षमतेने कुकडीचे पाणी मिळत नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. या दुष्काळी स्थितीत जनावरे, फळबाग, जनावराचा चारा यासाठी मांगी व इतर तलावात आवश्यक पाणी लवकरात लवकर सोडण्याची गरज आहे ही मागणी यावेळी करण्यात आली.

 

या प्रसंगी कृष्णा खोऱ्याचे प्रमुख अधिकारी कपोले साहेब यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त केले. तसेच मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी फेरजल नियोजन प्रस्ताव अंतिम टप्प्यात असलेचे ही त्यांनी सांगितले असल्याचे चिवटे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष पै. रामभाऊ ढाणे, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे व सिंचन भवन चे अधिकारी आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close