
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपक्रमांतर्गत करमाळा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा वाटप सोहळा सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे माजी चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, रामभाऊ ढाणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भरतभाऊ अवताडे, शिवराज जगताप, तात्यामामा सरडे, सुजित तात्या बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूण १३९ लाभार्थींना ३० प्रकारच्या गृहपयोगी भांड्यांचे संच वितरित करण्यात आले.
—
सामाजिक उपक्रम सुरूच राहणार : सुजित बागल
“माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा संपर्क कार्यालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आमदार आपल्या दारी यांसारख्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. आतापर्यंत २२०० बांधकाम कामगारांची मोफत नोंदणी पूर्ण झाली आहे. बांधकाम कामगारांना मिळणारे सर्व लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
♦ बांधकाम कामगारांसाठी प्रमुख लाभ:-
•मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
•संपूर्ण कुटुंबासाठी २ लाखांपर्यंत आरोग्य उपचार अनुदान
•मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत
•घरकुल आवास योजनेसाठी अनुदान
•कामगाराच्या मृत्यूनंतर वारसांना आर्थिक मोबदला



