-->
करमाळा

वडगाव द. जिल्हा परिषद शाळेत मनेरी गुरुजींना ग्रामस्थांकडून भावनिक निरोप

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

वडगाव दक्षिण (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनेरी गुरुजी यांच्या निरोप समारंभाला गावकऱ्यांनी आणि शालेय परिवाराने उपस्थिती लावली. सदा हसतमुख, मनमिळावू आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने शिक्षण देणारे गुरुजी हे गावाच्या जीवनातील अविभाज्य व्यक्तिमत्त्व ठरले होते.

 

शिक्षणकाळात मनेरी गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिक्षा न करता स्वतःच्या मांडीवर बसवून संस्कारांची शिकवण दिली. रस्त्यात कुठलाही विद्यार्थी भेटला तरी दोन गोड शब्द बोलल्याशिवाय ते पुढे जात नसत. गावातील प्रत्येकाशी आदराने बोलणारा असा शिक्षक वडगावला पुन्हा लाभणे अवघड असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शासनाच्या नियमानुसार सेवा विरामामुळे हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. गुरुजींना पुढील वाटचालीस ग्रामस्थांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

या प्रसंगी माजी सरपंच महादेव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास थोरात, विकास गायकवाड, इरफान शेख, जुम्मन पठाण, करण गायकवाड, चेतन गायकवाड, बबन टोणपे, जाकिर पठाण, सचिन शिंदे, आप्पा शिंदे, निलेश मोरे, मजनू पठाण, माजीद पठाण, अंगणवाडी सेविका काळे मॅडम, अंधारे मॅडम, मदतनीस घोडके मॅडम, शिंदे मॅडम तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close