-->
करमाळाराजकिय

पारेवाडी स्थानकावर एक्सप्रेसला थांबा द्यावा; मा.आ. संजयमामा शिंदे यांची डीआरएमकडे मागणी

रेल्वे, रस्ते, पाणी प्रश्नांवर माजी आमदार शिंदे सक्रिय; विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्थानकासह परिसरातील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची (डीआरएम) भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह निवेदन सादर करत पारेवाडी रेल्वे स्थानकावर मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस (गाडी क्र. 22731/22732) या एक्सप्रेस गाडीला पारेवाडी स्थानकावर थांबा देण्यात यावा, ही प्रमुख मागणी केली.

 

याशिवाय या रेल्वे स्थानकासाठी नवीन पादचारी पूल, गेट क्र. २८ मधील रस्त्याचे व वॉलचे काम, तसेच गेट क्र. २८ मधील बोगद्यातून स्टेशनकडे येणारा रस्ता सरळ करण्याबाबतही मागणी करण्यात आली. पारेवाडी परिसरातील प्रवाशांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांबाबत तातडीने प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविण्याची विनंती ही यावेळी करण्यात आली असून, डीआरएम यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

या भेटीत कुर्डुवाडी, केमसह इतर स्थानकांवरील समस्यांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी माजी जि. प. सदस्य शिवाजीराव कांबळे, उद्योजक निलेशशेठ धोका, बबलु कांबळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अ‍ॅड. अजित विघ्ने, सरपंच सचिन वेळेकर, प्रशांत नवले, बबननाना साळवे, सचिन खेडकर, स्वीय सहाय्यक संजय अंबोले यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

करमाळा तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, रेल्वे यासह अनेक प्रश्नांबाबत कार्यकर्त्यांच्या सूचनांनुसार आपण नेहमीच कार्यरत असून विकासकामांच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close