-->
करमाळासामाजिक

सहकार युवक मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; रक्तदान शिबिरात ५२ जणांचा उत्स्फूर्त सहभाग

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा शहरातील सहकार युवक मित्र मंडळ (ट्रस्ट) तेली गल्ली यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

 

या शिबिराचे उद्घाटन करमाळा उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी दीपप्रज्वलन करून केले. तर कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनाने करण्यात आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सहकार युवक मित्र मंडळाचे हे कार्य उल्लेखनीय असून प्रत्येक मंडळाने सामाजिक जाणिवेतून अशा उपक्रमात सहभागी व्हावे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठाई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. अजयकुमार तोरड यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गणेशोत्सव फक्त उत्सवाच्या स्वरूपात न साजरा करता रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांतून केला पाहिजे. यासाठी लागणारी कोणतीही वैद्यकीय मदत आम्ही २४ तास उपलब्ध करून देऊ.

 

या शिबिरात शहरातील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान खाटेर यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांना प्रेरणा दिली. तसेच व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजूशेठ शियाळ, सुशील कात्रेला, प्रकाश यादव, दिलीप क्षीरसागर, बंडू मुसळे, धीरज सोळंकी, जितेंद्र क्षीरसागर, तुकाराम देशमाने, विकास पवार, सुनील अंधारे, दिनेश देशमाने, सचिन फलके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close